रस्त्याची दूरवस्था; खड्ड्यातील सांडपाण्यात आंदोलन

रस्त्याची दूरवस्था; खड्ड्यातील सांडपाण्यात आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहराच्या पुर्व भागातील झांजेश्वर मंदिर (Jhanjeshwar Temple) अमरधामसह मरीमाता चौक ते अमरधाम रस्त्याची अत्यंत दूरवस्था (poor road condition) झाल्याने अंत्ययात्रा नेतांना नागरिकांचे प्रचंड हाल होतात.

यास्तव आज जनाधिकार रक्षा मंचतर्फे (Janadhikar Raksha Manch) रत्यावरील खड्ड्यात (potholes) साचलेल्या सांडपाण्यात कागदी नाव व फुले सोडून तसेच एप्रिल फूलच्या प्रतिकृतीचे रोपण करून अनोख्या पध्दतीने निषेध आंदोलन (agitation) करण्यात आले. यावेळी कार्यकत्यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

झांजेश्वर मंदिर अमरधामकडे जाणारा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी गटारी (Gutters) तुंबल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचते. त्यामुळे संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून अंत्ययात्रा नेतांना मोठी गैरसोय होते. रस्त्यावरील अतिक्रमणांसह अमरधाममध्ये वीज (electricity), पाणी (water), दहन ओटे, गळके पत्रे, नादुरुस्त कुपनलिका आदी समस्यांमुळे या भागातील नागरिकांना झांजेश्वर अमरधामऐवजी मोसमनदी ओलांडून संगमेश्वर भागातील श्रीरामनगर अमरधाममध्ये मृताचे अंत्यसंस्कार करण्यास जावे लागत आहे.

मृतदेह (Corpses) नेतांना वैकुंठरथ वाहक देखील मृतदेह पडण्याच्या भीतीपोटी रस्त्यावरील खड्डे व सांडपाण्यातून परमेश्वराचे नामस्मरण करीत मार्गक्रमण करतात. खड्ड्यांमुळे अपघातांची संख्याही वाढली असून प्रसंगी हमरीतुमरीची भांडणे पाहावयास मिळतात. या समस्या निवारणासाठी वारंवार निवेदने (memorandum) देऊनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

गेल्या वर्षी रस्ता डांबरीकरणाचा प्रस्ताव (Road asphalting) तयार असून लवकरच कामास प्रारंभ होईल, असे लेखी आश्वासन मनपातर्फे देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही समस्या कायम असल्याने आज 1 एप्रिलचा मुहूर्त साधून जनाधिकार रक्षा मंचतर्फे रस्त्यातील खड्ड्यात कागदी नाव व फुले सोडून तसेच एप्रिल फूलच्या प्रतिकृतीचे रोपण करून विकास की नैय्या तैरेगी की नही; असे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनपाने खिलाया अजब फूल, पब्लिक को बनाया एप्रिल फूल, महाबजेट का गजब खेल रस्ता-गटार सबकुछ फेल आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला होता. प्रभाग 4 अधिकारी अब्दुल कादरी यांचे प्रतिनिधी बीट मुकादम अजय चांगरे यांना निवेदन देऊन महिन्याभरात रस्त्याचे डांबरीकरण व अमरधाममधील समस्या न सुटल्यास मनपा प्रवेशद्वाराजवळ चक्री आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात नेविलकुमार तिवारी, गजानन येवले, आशिष पोरवाल, खुशाल पाटील, पवन दुसाने, यशवंत पहिलवान,

अनिल महाले, सत्पाल महाराज, दीपक उंदाळे, रोहीत रौंदळ, यशवंत पवार, सुफी जमील कादरी, मुफ्ती वासीफ, हाफीज मो. यासीन मो. कलीम, एजाज अहमद मो.यासीन, मो. इस्माईल मो. मुर्तुजा हसन, कमाल अन्वर, वसीम अहमद आदी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी किल्ला पोलीस ठाण्याचे पीएसआय खरगे, अनिल पाटील, एएसआय जगन अहिरे आदिंनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Related Stories

No stories found.