स्वच्छ सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद; महिन्याभरात 'इतके' फीडबॅक

स्वच्छ सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद; महिन्याभरात 'इतके' फीडबॅक
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वच्छ भारत अभियानासाठी (swachh bharat abhiyan) नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik NMC) नाशिककरांचे ऑनलाइन अभिप्राय (Online feedback) मागवण्यात आले होते. पालिकेने आवाहन करुनही आणि राजकीय पक्ष मैदानात उतरुनही नाशिककरांकडून स्वच्छ भारत अभियानास अल्प प्रतिसाद (Poor response) दिल्याचे दिसून आले आहे. कारण शनिवार (दि.30) शेवटच्या दिवशी अवघ्या 34 हजार 246 नागरिकांनी ऑनलाइनद्वारे आपला फीडबॅक दिला...

नाशिक शहराचा (Nashik City) स्वच्छ शहरात देशातून पहिल्या दहामंध्ये तरी क्रमांक यावा याकरिता पालिका प्रशासनाकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी नाशिकचा क्रमांका अकरावरुन थेट सतरावर गेला होता.

यानंतर खडबडून झालेल्या पालिकेने पुन्हा स्वच्छ भारत अभियानात नाशिकचा क्रमांक चांगल्या पद्धतीने यावा याकरिता नागरिकांना स्वच्छ भारत अभियानात सहभाग होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते.

सोशल मीडियाद्वारे (Social Media) नागरिकांना संदेश टाकून स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी सांगितले जात होते. 1 एप्रिलपासून नागरिकांना ऑनलाइनद्वारे त्यांचा फीडबॅक देता येत होता. सुमारे महिनाभर नागरिकांकरिता त्यांचे फीडबॅक () देण्याची सुविधा होती.

एक लाखापर्यंत नागरिकांचे फीडबॅक जातील अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरल्याचे दिसले. पालिका प्रशासन नागरिकांपर्यत जाऊ शकले नाहीत का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून नाशिक शहराचा स्वच्छ सर्वेक्षणासाठी शिवसेना (Shivsena), भाजपने (BJP) जनजागृती करत शहरात ठिकठिकाणी जाऊन साफसफाई केली.

राजकीय पक्ष पुढे सरसवल्यानंतर नागरिकांचा ऑनलाइन फीडबॅकचा प्रतिसाद पन्नास हजारांच्या पुढे तरी जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु राजकीय पक्षांनाही यात अपयश आल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.