
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात स्थायी समितीकडून (Standing Committee) गेल्यावर्षीचे सुधारित अंदाजपत्रक (Budget) व येणार्या नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले जाते.
मात्र यंदाच्या विलंबामुळे दि.27 फेब्रुवारी ऐवजी महापालिका 2023-24 चे अंदाजपत्रक 3 मार्च ला सादर करणार असल्याचे वृत्त आहे. बांधकाम विभागा (Construction Department) कडून कामांची माहिती देण्यास केली जात असलेली दिरंगाई व बजेटच्या प्रती छापण्यास होत असलेल्या विलंबामुळे अर्थसंकल्प निर्धारित 27 फेब्रुवारी ऐवजी लांबणीवर टाकण्यात आले असून, दि.3 मार्च रोजी अंदाजपत्रकीय महासभा बोलाविण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरवर्षी लोकप्रतिनिधींची राजवट असतानादेखील महापालिकेने अनेक वर्षे फेब्रुवारीत अंदाजपत्रक सादर करण्याची आपली परंपरा कायम ठेवलेली होती. ठोस कारण दिली गेली नसली तरी सन 2023-28 च्या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाने (Construction Department) जी कामे सुचविली आहेत या कामांची गरज व त्यावर होणार्या खर्चाबाबत खुद्द मनपा आयुक्तांना साशंकता असल्याने त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकान्यांकडून त्या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव मागविले आहेत.
त्याचबरोबर स्वतः आयुक्त काही ठिकाणी भेटी देऊन खात्री करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेक विभागांकडून अजुनही लेखा व वित्त विभागाल (Accounts and Finance Department) आपले प्रारूप अंदाजपत्रक सादर केलेली नाहीत. मात्र, सध्या प्रशासकीय राजवट असतानादेखील अंदाजपत्रक लांबणीवर टाकण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.
प्रारूप अंदाजपत्रक होणार सादर लेखा विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्यास विलब झाल्याचे दुसरे कारणही दिले जात असून, सर्व विभागाती त्यांचे प्रारूप बजेट सोमवार (दि.27) रोजी सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनेक खात्यांकडून त्यांचे बजेट सादर केले नसल्यामुळे लेखा व वित्त विभागाकडून अंदाजपत्रकाची छपाईदेखील लावणीवर पडल्याने आता 3 मार्च शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता आयुक्तांनी महासभा बोलविली आहे. या महासभेत प्रारूप: अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.