येवला तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

येवला तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

येवला। प्रतिनिधी Yevla

तालुक्यातील एरंडगाव - शेवगे - सातारे - पाटोदा ( Erandgaon, Shevge, Satare, Patoda ), या रस्त्याची ( Roads) दयनीय अवस्था झाली असून, त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? अशी परिस्थिती निर्माण होऊन वाहनधारक, शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत.

अशीच अवस्था चिचोंडी - एरंडगाव व इतर रस्त्यांची झाली असून रस्ता खड्डेमय झाल्याने दळणवळणाच्या दृष्टीने जिकरीचे झाले आहे. या रस्त्याची झालेली दैना बघून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. परिसरात एरंडगाव, पाटोदा, मोठ्या बाजारपेठेचे गाव असून, याच रस्त्यावरून परिसरातील छोट्यामोठ्या खेड्यापाड्यातील वाहनधारकांना कशीबशी खड्ड्यातून वाट काढत यावे लागते.

काही ठिकाणी रस्त्याच्या साइडपट्ट्या पावसामुळे तुटून तो धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी तर रस्त्यातच मध्यभागी मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. तालुक्याच्या मुख्य रस्त्याला जोडणार्‍या प्रमुख रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर दिवसेंदिवस खड्ड्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय या रस्त्यावर प्रत्येकच वर्षी त्याच त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुरावस्था होत असते. या कामात संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे कामाच्या दर्जावरून दिसून येते. या रस्त्यावरल अपघतांबरोबरच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अ संबंधित विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून गुणवत्तापूर्ण काम न करणार्‍या ठेकेदारांमुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तालुक्यात ठेकेदारांची संख्या कमालीची वाढली असून फक्त टक्केवारी वर काम करणार्‍यांची संख्या वाढली आहे. तालुक्यात सर्वच रस्त्यांची गुणवत्तापूर्ण काम व्हावे, यासाठी प्रहार आवाज उठवणार आहे.

हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com