लक्षवेधी : रस्त्यांना लागेना मुहूर्त

पालखेड, कोराटे रस्त्यांची दुरवस्था
लक्षवेधी : रस्त्यांना लागेना मुहूर्त

पालखेड बं.। बापू चव्हाण । Palkhed

दिंडोरी (Dindori) - पालखेड (palkhed) कॉलनी व दिंडोरी (dindori) - कोराटे (korete) - मोहाडी (mohadi) या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून या रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. शेतकरी (farmer) व वाहनधारकांकडून या रस्त्यांच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला असून संबंधित विभाग लक्ष देणार का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पूर्व भागातील हे दोन्ही रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम (road work) रखडले आहे. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Untimely rain) या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी या रस्त्याने ये - जा करीत असतानाही दुरुस्तीकडे डोळे झाक करतात. लोकप्रतिनिधी फक्त निवडणूकीला (election) आश्वासने देतात परंतू नंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय आहे.

रस्त्यांना मंजुरी आहे परंतू करोनामुळे (corona) निधी (fund) नाही हे उत्तर लोकप्रतिनिधी किती वर्ष देणार हाही चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक वेळा येथील नागरिक, शेतकरी व वाहनचालकांनी तक्रारी व निवेदने (memorandum) देवूनही आजतागायत कुणीही दखल घेतली नाही. आज परिस्थिती पाहता रस्त्यांची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. रस्त्याला साईट पट्ट्या देखील नाही या साईट पट्ट्या पूर्णता उखडून गेले आहे.

रात्री-अपरात्री वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे दोन्ही रस्ते अतिशय महत्वाचे असुन या रस्त्यावर सह्याद्री (sahyadri) सारखी मोठी कंपनी याशिवाय पालखेड औद्योगिक वसाहत (Palakhed Industrial Estate) तसेच ओझर (ozer), दिंडोरी (dindori), पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant), नाशिक (nashik) आदी बाजारपेठामध्ये शेतकर्‍यांना वाहनधारकांना नेहमी ये-जा करावी लागते.

याशिवाय विद्यार्थ्यांना (students) शिक्षणासाठी ये - जा करावी लागते. त्यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांनाही शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागत आहे. अत्यावश्यक वेळी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. फक्त मलमपट्टीवरच समजूत घातली जाते.

परंतु काही दिवसातच या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होते. कोराटे येथील वाघ नाल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून ऐरणीवर आहे. या नाल्याबाबत अनेक वेळा तक्रारी मागण्या करुनही याकडे दुर्लक्षच झाले आहे. येथे कायम धुळीचे साम्राज्य असल्याने द्राक्षबागांना धुळीचा परिणाम होवू नये, म्हणून शेतकर्‍यांकडून रस्त्यावर पाणी सोडून चिखल केले जाते. तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करुन नागरिकांची परवड थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तालूक्याला जोडणार्‍या रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून मागण्या तरी किती वेळा करावे, हा प्रश्न पडला आहे. निवडणूकीवेळी लोकप्रतिनिधी शब्द देतात परंतू नंतर निधीचा बाहु करतात. मग सर्व सामान्य नागरिकांनी कुणाकडे मागणी करावी हा मोठा प्रश्न तयार झाला आहे. नागरिकांच्या संयम न बघता संबंधितांनी दखल घ्यावी.

रामभाऊ कदम, माजी उपसरपंच कोराटे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com