दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू आहे. संथ गतीने काम केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठिक-ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.

नाशिक-कळवण राज्य मार्गाचे अकराळे फाटा ते कळवण पर्यंत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक पूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करून गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू केले मात्र अद्यापही दिंडोरी शहरातील काँक्रिटीकरण व ठिक-ठिकाणी नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.

वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे, आरोग्य विद्यापीठ ते अकराळे फाटा या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. नाशिक गुजरात राज्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे.