नाशिक धरणपूर हायवे
नाशिक धरणपूर हायवे
नाशिक

नाशिक - धरणपूर हायवेची दयनीय अवस्था

महाराष्ट्र-गुजरात राज्याला जोडणारा रस्ता

Gokul Pawar

Gokul Pawar

गोळशी| Golshi

सावळघाट परिसरात झालेल्या पावसामुळे नाशिक धरणपूर हायवेची दयनीय अवस्था झाली आहे. यातील आंबेगन आश्रम शाळा ते सावळघाटाच्या सुरवाती पर्यंत रस्ता उखडून गेल्याने बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन दुरुस्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नाशिक पेठ हायवेला केंद्र शासनाने नॅशनल हायवे म्हणून घोषित करून भरपूर असा निधी रस्त्यासाठी खर्च केला आहे, परंतु बांधकाम विभागाचे कामाकडे पुरेशे लक्ष न दिल्याने तीन वर्षांतच रस्त्याचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याला जोडणारा हा महत्वपूर्ण रस्ता मानला जातो. म्हणून या रस्त्याने वाहनांची दरवळ अतिशय दाट असते परंतु यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यात खडा की खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना खूप कसरत करावी लागते.

Deshdoot
www.deshdoot.com