कळवण तालुक्यातील अंगणवाड्यांची दुरावस्था

कळवण तालुक्यातील अंगणवाड्यांची दुरावस्था

पुनदखोरे | Punadkhore

कळवण शहरातील (Kalwan City) बर्‍याच अंगणवाडयांची दुरवस्था (Damage Of Anganwadi) झाली आहे. काही अंगणवाडया जिर्ण झाल्याने अंगणवाडी सेविंकासह (Anganwadi Sewika) शिक्षण घेणार्‍या बालकांचा (Chiled) जीवाला धोका निर्माण झाला आहे.

कळवण महिला व बालविकास प्रकल्प (Kalwan Women's And Chlid Development Project) अंतर्गत प्रकल्प 1 मध्ये 176 अंगणवाडी असुन प्रकल्प 2 मध्ये 139 अंगणवाडया आहे. त्यात बर्‍याच अंगणवाडया जिर्ण अवस्थेत आहे. कळवण शहरातील गणेशनगर, रामनगर, गांधी चौक, फुलामाता चौक या परीसरातील अंगणवाडयांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तेथील अंगणवाडी सेविका व लहान बालक यांना रामभरोसेच राहावे लागत आहे.

शहरातील गणेशनगर भागातील अंगणवाडीची अवस्था अतिशय बिकट आहे. उंदीर व घुसींनी भिंती पोखरुण ठेवल्या आहे. येणारा पोषण आहाराचे (Nutrition Diet) सुद्धा नासधूस करून ठेवली असुन संगणक व इतर वस्तूचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

शौचालयाची भिंत पडघडीस आली असुन ती पडल्यास मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने तत्काळ शहरासह तालुक्यातील अंगणवाडींचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी छावा सेनेकडून होत आहे.

कळवण शहरातील अंगणवाडयांची अंत्यत दुरावस्था झाली आहे. एकीकडे अंगणवाडी डीजीटल (Digital Anganwadi) केल्याबाबत प्रशासन गाजावाजा करीत आहे. तर दुसरीकडे अंगणवाड्यांची दुरावस्था झाली आहे.

याबाबत महिला व बालकल्याण प्रकल्प नगरपंचायतीकडे बोट दाखविते तर नगरपंचायत प्रकल्पाकडे बोट दाखवित आहे. मग अंगणवाडयांना वाली कोण ? प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

- प्रदीप पगार, तालुकाध्यक्ष-छावा क्रांतीविर सेना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com