मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे आज (दि. 24) रोजी लक्ष्मी पूजनाचा (Lakshmi Pujan) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्त कोषागारातील (ट्रेझरी) (Treasury) तिजोरीचे

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) व सौ. सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते विधीवत पुजन करून लक्ष्मी पूजन करण्यात आले. मनपात दीपावली (diwali) निमित्ताने मनपात ट्रेझरी पूजनाची चांगली प्रथा असल्याचे आयुक्त म्हणाले.

लक्ष्मीला प्रार्थना आहे, मनपाची गंगाजळी सतत वाढत राहो. जेणेकरून नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा देता येतील. नागरिकांचीही भरभराट होवो. शहरात सौहार्दपूर्ण वातावरण राहो. त्यामुळे शहराचा विकास (Development of the city) वेगाने होईल, अशी भावना मनपा आयुक्तांनी व्यक्त केली. यावेळी श्रीकांत पुलकुंडवार, कृष्णकांत पुलकुंडवार, मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी,

अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी (Superintending Engineer Uday Dharmadhikari), मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन (Chief Accounts and Finance Officer Narendra Mahajan), मुख्य लेखा परिक्षक बोधिकिरण सोनकांबळे, उप मुख्य लेखाधिकारी गुलाब गावित, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड, दत्तात्रय पुंड, वाल्मिक ठाकरे, अजय कमोद, दादाभाऊ चौरे, हंसराज वर्मा, गोकुळ राऊत, वैभव मोटकरी, अरुण महाले, वसंत माळवे, अरुण बटाटे, विश्वास जोगी, हुसेन पठाण, सागर पीठे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com