त्र्यंबकेश्वर तालुक्यात राजकीय भूकंप

सेना-भाजप नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
त्र्यंबकेश्वर तालुक्यात राजकीय भूकंप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील Trimbakeshwar Taluka हरसूल जिल्हा परिषद गटाचे भाजपचे नेते विनायक माळेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे, शिवसेनेचे युवा नेते मिथुन राऊत यांनीही कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये congress Party प्रवेश केला आहे.या तिघांच्या काँग्रेस प्रवेशाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय गणितांवर परिणाम होणार आहे.

यावेळी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर MLA Hiraman Khoskar, काँग्रेस नेते अ‍ॅड. संदीप गुळवे, संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसचे नेते ड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वावर पुनश्च विश्वास ठेवून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी नेते माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, भाजप नेते संपत काळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष निलेश कडू, रामदास बाबा मालुंजकर, टाकेद बुद्रुक सरपंच रतन बांबळे, माजी सरपंच जयराम धांडे, राजाराम भोसले, कारभारी नाठे, माजी सरपंच रमेश जाधव, कचरू पाटील कडभाने, शिवाजी शिरसाठ, दत्तू वाजे, ज्ञानेश्वर भोसले, राजाराम शेलार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. या नेत्यांच्या प्रवेशामुळे इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसला खर्‍या अर्थाने बळकटी आल्याचे ड. गुळवे म्हणाले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गटाच्या अपक्ष जिल्हा परीषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर यांचे पती तथा इंजि. विनायक माळेकर हे हरसूल गटातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील राजकारणात त्यांचा वरचष्मा आहे.

सभापती मोतीराम दिवे हे सुद्धा प्रबळ व्यक्तिमत्व आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. पांडुरंग राऊत यांचे चिरंजीव मिथुन राऊत यांचाही तालुक्यात दबदबा असून युवा पिढीवर त्यांची पकड आहे. ह्या तिघांच्या काँग्रेस प्रवेशाने दोन्ही तालुक्यात राजकीय स्थित्यंतरे घडणार आहेत. शेकडो समर्थकांसह तिघांनी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे.

हरसूलसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासी दुर्गम भागातील सर्व विकासकामे आगामी काळात होतील. समावेशक विचारधारेच्या पक्षात राहून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

- विनायक माळेकर, नूतन काँग्रेस नेते हरसूल

माझे वडील स्व. पांडुरंग राऊत यांनी हरसूल भागातील जनता जनार्दनासाठी खूप काम करायचे स्वप्न होते. इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होईल. जनतेसाठी यापुढेही माझी जनसेवा सुरू राहील.

- मिथुन राऊत, युवानेते

Related Stories

No stories found.