
इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri
जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Reservation for Maratha Community) मिळत नाही तो पर्यंत राजकीय पुढाऱ्यांना इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) समनेरे गावात (Samanere Village) प्रवेश बंद करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असेही गावाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गावाने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे...
गावातील सर्व तरुण हे शिकलेले असून सुद्धा केवळ आरक्षणामुळे त्यांना नोकरी लागत नाही. त्यामुळे तरुण मुलांचे लग्न होत नसून गावात मुली देण्यासही टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तरुण (Youth) वर्गात नैराश्य आले असून सर्व मुले हे व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांना (Political leaders) गावबंधी करण्यात येऊन आरक्षण मिळेपर्यंत गावात येऊन द्यायचे नाही अशी चर्चा करून ठराव करण्यात आला. तसेच कुठल्याही नेत्यांनी तरुण मुलांना कुठल्याही सभा व मेळावे यास घेऊन जाऊ नये अशी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, या चर्चेप्रसंगी अॅड. रोहीत उगले, पोपट जाधव, अनिल जाधव, शरद चौधरी, शरद उगले, किसन उगले, लक्ष्मण जाधव, देविदास उगले, माजी सरपंच शंकर उगले, बंटी उगले, नागेश जाधव, भावड्या जाधव, सागर जाधव, अशोक जाधव, प्रमोद उगले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.