लवकरच राजकीय भूकंप ?

लवकरच राजकीय भूकंप ?

सिन्नर | विलास पाटील Sinnar

राष्ट्रवादीचे पालकमंत्री छगनराव भुजबळ (Guardian Minister Chhaganrao Bhujbal) यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (mla nilesh lenke) यांची शिवसेनेचे (shiv sena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (fromer mla rajabhau vaje) यांच्याशी वाढलेली सलगी आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) यांच्यात सारे काही आलबेल नाही हेच दाखवून देत आहे.

राज्यात तीन पक्षांची आघाडी असली तरी आगामी नगर परिषद (nagar parishad), जिल्हा परिषद (ziphad parishad) निवडणुकीत (election) तालुक्यात आघाडी होणार नाही असा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्यासमोर कोकाटे यांनी इशारा दिल्यानंतर वाजे यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची सलगी वाढते आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणे सहाजिकच आहे.

काँग्रेस (congress), राष्ट्रवादी, शिवसेना (shiv sena) पुन्हा काँग्रेस, भाजपा (bjp) करत पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास करणार्‍या कोकाटे यांना विधानसभा निवडणुकीत (assembly elections) काँग्रेसने साथ दिली. भुजबळ यांच्या समता परिषदेने वाजे यांची साथ सोडत कोकाटेना साथ दिली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांचा विजय (निसटत्या फरकाने) झाला.

या दोघांची साथ नसती तर कोकाटे यांचा विजय शक्यच नव्हता. निवडणुकीच्या काळात आणि निवडून आल्यानंतर काही दिवसांपर्यंत कोकाटेदेखील खा. शरद पवार (sharad pawar) व आघाडीलाच त्यांच्या विजयाचे श्रेय देत होते. मात्र, त्यानंतर अजितदादांच्या (ajit pawar) मर्जीतले बनल्याने आता कोणाचीच गरज नाही, अशा अविर्भावात ते अनेकांना दूर सारू लागल्याने पक्ष आणि त्यांच्यातले अंतर वाढू लागले आहे.

सत्तेची पदे मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करायचा आणि विजयानंतर त्या पक्षाच्या संघटनात्मक ढाच्यात प्रवेश करीत सर्व पदांवर आपल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्या पक्षातल्या निष्ठावानांना बाजूला सारायचे ही कोकाटे यांची पद्धती राहिली आहे. राष्ट्रवादीतही तोच कित्ता गिरवला जाऊ लागल्यानंतर अस्वस्थता वाढणे साहजिक आहे.

बाळासाहेब वाघ (balasaheb wagh) पूर्वाश्रमीचे कोकाटे समर्थक असले तरी कोकाटे यांच्या आधी राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी तालुकाध्यक्षपद पटकावले आहे. त्यामुळे त्यांना हलवणे कोकाटे यांनी टाळले. मात्र, त्यानंतर आपल्याच कार्यकर्त्यांना सर्व पदावर बसवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वाभाविक होते.

शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांना पक्षाच्या धोरणाच्या विरोधात केलेले एक ट्वीट महाग पडले आणि थेट प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पदावरून दूर केले. त्यामुळे या पदावर पक्षातील निष्ठावंताची निवड होण्याची अपेक्षा होती. मात्र, जयंत पाटील (jayant patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात सुभाष कुंभार यांची शहराध्यक्षपदी ज्या पद्धतीने कोकाटे यांनी निवड वदवून घेतली, त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.

याच मेळाव्यात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मेळाव्यातील महिलांची संख्या पाहून तालुकाध्यक्ष मेघा दराडे यांचे कौतुक केले होते. मेळाव्यानंतर काही दिवसातच त्यांचे पद काढून घेण्यात आले व कोकाटे समर्थक सुरेश कुर्‍हाडे यांच्या पत्नीची या पदावर नियुक्ती करण्यात आली. इतर पदावरही याच पद्धतीने कोकाटे समर्थकांची नियुक्ती झाल्याने निष्ठावानांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

तालुक्यातील राष्ट्रवादीत भुजबळाबरोबरच जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड सिन्नर तालुक्यातीलच (sinnar taluka) आहेत. तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचाही तालुक्यात, समाजात दबदबा आहे. या सर्वांनाच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, कोकाटे यांच्याकडून आपल्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुसळगाव, देवपुर, चास (दापूर), नांदुर-शिंगोटे (वावी) गटासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना कोकाटे यांनी दिल्याने ही अस्वस्थता अजून वाढली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक राजाराम मुरकुटे यांची मुसळगाव गटातून निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू असतानाच कोकाटे यांच्या सूचनेनुसार वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर कामाला लागल्याने चलबिचल अधिकच वाढली आहे.

सिन्नर शहरातील माळी समाजाचे प्राबल्य पाहता नगरपरिषद निवडणुकीत समता परिषदेला सन्मानाने जागा देण्याऐवजी कोकाटे समर्थकच उड्या मारत असतील तर अस्वस्थता अजूनच वाढणार आहे. डिसेंबरपासून निवडणुकीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यापूर्वीच पालकमंत्री भुजबळ माळी समाजाचे प्राबल्य असणार्‍या धोंडवीरनगरला येतात.

महात्मा फुले पुतळ्याचे (Mahatma phule statues) अनावरण करतात, तेव्हा राजाभाऊ वाजे त्यांच्यासोबत व्यासपीठावर असतात. कोकाटे राष्ट्रवादीचे आमदार असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री त्यांना न विचारता शिवसेनेच्या माजी आमदारांसोबत कार्यक्रम करतात. वाजे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेला कोट्यवधीचा निधी (fund) देतात, हे उगाच होत नाही.

स्वतःच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाला आपण नाचवू या भ्रमात असलेल्या कोकाटे यांना शह देणार्‍या अशा अनेक घटना येत्या काही दिवसात घडणार आहेत. दिवाळीत म्हणावे असे फटाके तालुक्यात फुटले नाहीत. मात्र, स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी तालुक्यात अनेक राजकीय फटाके फुटण्याची तयारी सुरू झाली आहे. अगदी राजकीय भूकंप म्हणता येईल अशा काही घटना घडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com