जेलरोड येथे पोलिसाला बेदम मारहाण

जेलरोड येथे पोलिसाला बेदम मारहाण

नाशिकरोड | Nashik

जेलरोड परिसरात असलेल्या जय हिंद नगर या ठिकाणी चार जणांच्या घोळक्याने एका पोलिसाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला मात्र गुन्हा दाखल तब्बल चोवीस तासानंतर दाखल झाला मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव सागर बाळनाथ शिंदे राहणार जेलरोड जय हिंद नगर असे असून शिंदे हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत आहे.

शुक्रवारी रात्री शिंदे आपला मित्र संजय कुलथे याच्या सोबत गप्पा मारत होते याच दरम्यान सागर शिंदे यांचा मित्र ऋषिकेश चौधरी याचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रशांत पूर्ण नाव माहिती नाही. त्याचे आणखी तीन साथीदार आले. त्यांनी शिंदे व कुलथे यांना दमदाटी करून तात्या चौधरी कुठे आहे असे विचारले.

शिवीगाळ करून पोलीस कर्मचारी सागर शिंदे यांना धारदार शस्त्राने लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले याप्रसंगी संजय कुलथे यांनाही या चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. त्यामुळे हे दोघे जखमी झाले त्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान सदरचा प्रकार घडल्यानंतर तब्बल चोवीस तासाने याप्रकरणी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी या परिसरात भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयावर एका टोळक्याने हल्ला करून कार्यालयाचे नुकसान केले होते.

एकाच दिवशी या दोन्ही घटना घडल्याने जेलरोड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी शिंदे मारहाणप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com