रामकुंडावर पोलिसांकडून टवाळखोरांना दंडुक्यांचा प्रसाद

विशेष पोलीस पथकाची कारवाई
रामकुंडावर पोलिसांकडून टवाळखोरांना दंडुक्यांचा प्रसाद

पंचवटी । Panchavti

पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchavti Police Station) वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत (Senior Inspector Ashok Bhagat) यांनी गंगाघाट (Gangaghat) परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक (Police Squad) तयार करून संध्याकाळी चार वाजेनंतर गंगाघाट परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर लाठ्या चालवून त्यांना हाकलून लावत गंगाघाट परिसरात भयमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. पोलिसांनी थेट दंडुक्यांचा प्रसाद टवाळखोरांना देण्यास सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

गंगाघाट परिसरात चालणारे अवैध धंदे (Illegel Proffession) आणि टवाळखोरांकडून होणारी पर्यटक आणि भाविकांची होणारी लूट (devotees) याबाबत अनेकांनी तोंडी तक्रारी पंचवटी पोलीस ठाण्यात केल्या होत्या. याची गंभीर दखल पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी घेतली असून याबाबत दररोज संध्याकाळी चार वाजेनंतर गंगाघाट परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्यांचा प्रसाद (police Action On robbers) देत खाकीचा दणका देण्यास सुरुवात केली आहे .

संध्याकाळी अचानक पंचवटी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, महिला पोलीस नाईक एम एम सानप, कल्याणी पिंगळे, रमेश ढुमसे, कुणाल पथनोरे यांच्या पथकाने गंगाघाट परिसर गाठून रामकुंड, अहिल्यादेवी होळकर पूल, गांधी तलाव, दुतोंड्या मारोती, यशवंतराव महाराज पटांगण, निळकंठेश्वर मंदिर, दहीपूल, संत गाडगे महाराज पूल, गौरी पटांगण सांडव्यावरची देवी, जुना भाजी बाजार, वस्रांतर गृह, गोरनंदी महादेव मंदिर, कपालेश्वर मंदिर परिसरात मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्यांचा प्रसाद देत गंगाघाट परिसर मोकळा केला.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करीत हि कारवाई यापुढे दररोज सुरु ठेवावी अशी मागणी देखील केली आहे.

गंगाघाट परिसरात अनेक टवाळखोर काही काम नसताना देखील बसून राहत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच,हे टवाळखोर महिलांची छेडछाड करीत सामान्य नागरिकांवर दादागिरी करीत दहशत करीत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तोंडी सांगितल्या होत्या. त्यामुळे हि कारवाई सुरु करण्यात आली आहे. यापुढे रामकुंड आणि गंगाघाट परिसरात टवाळखोर दिसल्यास त्याला दंडुक्यांचा प्रसाद देऊन त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com