सापळा रचत शिताफीने साडेतीन हजार किलो मांस पकडले

सापळा रचत शिताफीने साडेतीन हजार किलो मांस पकडले

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

मालेगावहून (Malegoan) मुंबईच्या (Mumbai) दिशेने गोमांसाने (Beef) भरलेला ट्रक जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांना मिळाली...

मिळालेल्या माहितीच्या आधारे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) उड्डाणपुलावर (Flyover) स्टेट बँक चौक (State Bank Chowk) येथे ट्रक पकडून पोलिसांच्या (Police) ताब्यात दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री मालेगाव येथून मुंबईच्या दिशेने निघालेला गोमांसाचा ट्रक साडेअकराच्या सुमारास नाशिक येथे दाखल होत आहे, अशी माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम आव्हाड (Purushottam Awhad), चंदन भास्करे (Chandan Bhaskare), तेजस नेहरकर (Tejas Neharkar), अनिकेत कुमावत (Aniket Kumawat), आशिष सिंग (Ashish Singh), नंदेश ढोले (Nandesh Dhole) व संदेश धात्रक (Sandesh Dhatrak) यांना मिळाली.

माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी एम. एच. ४१ एयु १९०२ हा ट्रक (Truck) अडवून अंबड पोलिसांना (Ambad Police) घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत ट्रक ताब्यात घेतला.

मजीद खान शहीद खान (२६, रा. जफरनगर मालेगाव) शेख जावेद, शेख दाऊद (३०, देवीला मळा, मालेगाव) शेख फिरोज शेख रहेमान (३४, रा. मोमीन पुरा मालेगाव) यांना ट्रकमध्ये असलेल्या ३ हजार ५०० किलोचे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोमांस तसेच ५ लाख रुपये किमतीचा ट्रक अंबड पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी (Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे (Ganesh Shinde) करीत आहे.

दरम्यान, गोमांस असलेल्या ट्रकच्या पुढील भागात एम. एच. ४१ एयू १९०२ या क्रमांकाची नंबर प्लेट लावली आहे, तर त्याच्या मागील बाजूस एम. एच. १२ जीटी ७००० या क्रमांकाची नंबर प्लेट लावली असल्याचे आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com