सिन्नर-शिर्डी मार्गावरील पिंपरवाडी टोलनाक्याजवळ लाखोंचा गुटखा जप्त

 सिन्नर-शिर्डी मार्गावरील पिंपरवाडी टोलनाक्याजवळ लाखोंचा गुटखा जप्त

वावी| प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांनी तब्बल तीस लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

वावी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अशोक लेलँड ट्रक क्र. एम. एच. २८/ बी. बी. २४३७ व टोयोटा इनोव्हा एम. एच. ४६/ एल. २९९९ ची तपासणी केली असता त्यात ७५ गोण्यामध्ये भरलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू मिळून ३० लाख ७८ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.

 सिन्नर-शिर्डी मार्गावरील पिंपरवाडी टोलनाक्याजवळ लाखोंचा गुटखा जप्त
शिक्षकप्रश्नी उपोषणाचा इशारा; आमदार किशोर दराडेंचा आक्रमक पवित्रा

याबाबत पोलीस नाईक देविदास माळी यांनी फिर्याद दिली असून सलीम खान अफसर खान,अहमद खान रेहमद खान,समीर खान अफसर खान ,शेख रेहमान शेख रहीम ,अरीफ खान दिलावर खान सर्व रा.ताजनगर अलीमनगर अमरावती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच २० लाखांचे दोन्ही वाहनेही जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक देविदास माळी,शेलार,भास्कर जाधव आदींच्या पथकाने केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com