...आणि तिच्या चेहऱ्यावर आले हसू

...आणि तिच्या चेहऱ्यावर आले हसू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईहून (Mumbai) रक्षाबंधनानिमित्त (Rakshabandhan) माहेरी आलेल्या मनीषा मेहता (Manisha Mehta) यांची सोन्याचे दागिने आणि पैसे असलेली बॅग रिक्षामध्येच राहिली....

सासरी काय सांगायचे या भीतीने त्यांनी तातडीने सरकारवाडा पोलीस स्टेशन (Sarkarwada Police Station) गाठत प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील तत्परतेने तपासचक्र फिरवत संबंधित रिक्षा शोधली आणि महिलेला तिची बॅग जशीच्या तशी तिच्या हवाली केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.२१) रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास मुंबईहून मनीषा मेहता रक्षाबंधनानिमित्त आपल्या माहेरी नाशिकला आल्या. तेथून रिक्षाने कस्तुरबानगर येथे गेल्या. उतरल्यानंतर मात्र, त्यांची सोने आणि काही रोख रक्कम असलेली बॅग सोबत नसल्याचे लक्षात आले. तोपर्यंत रिक्षा वाला निघून गेला होता.

भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठले आणि आपबीती सांगितली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी (Hemant Somvanshi) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पवार यांनी त्र्यंबक नाका येथील डीबी पथकाच्या टीमने त्र्यंबक नाका सिग्नल या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासले.

रिक्षाचे आणि रिक्षा चालकाच्या वर्णनावरून ही रिक्षा नाशिकरोड (Nashik Road) हद्दीत असल्याचे समजले. तेथे जाऊन तपास घेत तक्रारदार महिलेला त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग ताब्यात सुरक्षित देण्यात आली.

तक्रारदार महिला सणानिमित्त माहेरी आल्या होत्या. बॅग हरवल्याने सासरी काय सांगावे या भीतीने बॅग सापडेपर्यंत खूप रडत होत्या; मात्र, सरकारवाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात बॅग परत दिल्याने चेहऱ्यावर हसू फुलले. आयुष्यात त्यांनी पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढल्याचे त्यांच्या आईने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com