अवैध वाळू तस्कारांवर पोलिसांचे छापे

ग्रामीण पोलिसांकडून 72 लाखांचे गौणखनिज जप्त
अवैध वाळू तस्कारांवर पोलिसांचे छापे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) सिन्नर (sinnar) व येवला (yeola) तालुक्यातील अवैध वाळू तस्करी (Illegal sand smuggling) करणार्‍यांवर छापे (raid) टाकून 4 हायवासह एकूण 72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करणे, राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील (State and national highways) अवैध वाहतुक व वाळुची (गौण खनिज) होणारी तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (District Superintendent of Police Sachin Patil) यांचे आदेशान्वये जिल्हाभर कारवाई करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.31) ग्रामीण पोलीस पथकाने सिन्नर एम. आय. डी. सी. (Sinnar MIDC) व येवला तालुका (yeola taluka) पोलीस ठाणे हद्दीत वाळुची अवैधरित्या तस्करी करणार्‍या वाहनांवर छापे टाकुन कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे सिन्नर व येवला परिसरात गौणखनिजाची अवैधरित्या वाहतुक व तस्करी होत होती. त्यांच्या सूचनेनूसार पोलीस पथकाने सिन्नर एम.आय. डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचाळे गावचे शिवारात पंचाळे ते सिन्नर जाणार्‍या रस्त्यावर तपासणीसाठी ट्रक थांबवले असता ट्रक क्र. एम. एच. 15/ एफ. व्ही. 5385 मध्ये वाळु (गौणखनिज) भरलेली आढळून आली.

ट्रकचालकाकडे वाळू घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारा परवाना आढळून न आल्याने पोलीसांनी चालक गणेश शिवाजी नवले रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव (kopargaon) यास ताब्यात घेतले व त्याच्या कब्जातुन 55 हजार 390 रुपयांची अवैध वाळु व अशोक लेलंड कंपनीची ट्रक असा एकुण 15 लाख 55 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालकासह ट्रकचा मालक व वाळुची तस्करी (Sand smuggling) करणार्‍यांच्या विरोधात अवैधरित्या गौणखनिज वाहतुक व साठवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येवला तालुका पोलीस ठाण्याच्या (Yeola taluka police station) हद्दीत भरवस फाटा ते कोळपेवाडी रस्त्यावर अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक होत असल्याची बातमी मिळालेवरुन पोलीस नाईक विश्वनाथ काकड व हवालदार पाठक यांंच्या पथकाने भरवस फाटा परिसरात अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्‍या 3 हायवा ट्रक चालकांवर कारवाई केली. या छाप्यांमध्ये हायवा ट्रक क्र. एम. एच. 15/ ए. जी. 1957, एम. एच. 16/ ए. सी. 9934 व एम. एच. 17/ बी. झेड. 6555 या वाहनांवरील चालक विलास अशोक नागरे रा. विंचुर, देविदास निवृत्ती कानडे, रा. लौकी शिरसगाव ता. येवला व ज्ञानेश्वर पुंजाहरी बुरूंगुले रा. मिरगाव, वावी, ता. सिन्नर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सदर चालकांकडे कोणताही अधिकृत परवाना नसतांना शासनाची फसवणुक करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गौणखनिज वाळु चोरुन घेऊन जात असतांना ते मिळुन आले. या तिनही ट्रक चालक व मालक तसेच गौणखनिज वाळुची तस्करी करणारे मालकांविरूध्द भादवि कलम 379, 420, 465 ,467, 468, 471, 24 सह महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 48/7 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून एकुण 4 हायवा ट्रक आणि 72 लाख 26 हजार 235 रुपयांचा अवैध वाळु साठा जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com