मटका अड्डयावर पोलिसांचा छापा

मटका अड्डयावर पोलिसांचा छापा

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

सरकारवाडा पोलीस यांच्या पथकाने शरणपूर रोड (Sharanpur Road) येथे मटका अड्डयावर छापा टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली आली, तसेच या छापेमारीत रोख रकमेसह साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोसेफ सुरेश जाधव (वय २१), विकास दीपक गायकवाड (वय ३२), विक्रम प्रकाश जाधव (वय ३२), अर्जुन मनोहर गायकवाड (वय ३०), संजय मारुती जाधव (वय ४३) व जलालुद्दीन फिदा हुसेन शेख (वय ५९, सर्व रा. कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) हे शुक्रवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास शरणपूर रोडवरील मिशन मळा परिसरात मोकळ्या जागेत कल्याण नावाचा मटका (Matka) लोकांकडून पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे (Gambling) साहित्य असा ६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com