अजब शिक्षा : पेट्रोल पंपावर धुडगूस घालणारे हातात पोस्टर घेऊन करतायेत जनजागृती

अजब शिक्षा : पेट्रोल पंपावर धुडगूस घालणारे हातात पोस्टर घेऊन करतायेत जनजागृती

पंचवटी | वार्ताहर | पंचवटी

काही दिवसांपूर्वी दिंडोरी रोडवरील (Dindori Road) इच्छामणी पेट्रोल पंपावर (Icchamani Petrol Pump) चौघांनी पेट्रोल न देण्याच्या वादातून पंप कर्मचाऱ्यास मारहाण केली होती...

या संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी (Mhasrul police) त्यांना सात दिवस अनोखी शिक्षा केली आहे. हे संशयित पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांचे 'हेल्मेट वापरा सुरक्षित रहा' पेट्रोल पंपचालकांना सहकार्य करा असे प्रबोधन करताना दिसत आहे.

नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी स्वातंत्र्यदिनापासून (Independence Day) 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' (No Helmet No Petrol) अशी मोहीम सुरू केली आहे.

दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर चौघा संशयितांनी येथील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (Dnyaneshwar Gaikwad) (२४, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) यांच्याकडे पेट्रोल (Petrol) मागितले.

तेव्हा ज्ञानेश्वर पोपट गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार हेल्मेट नसल्याच्या कारणावरुन त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. पंप कर्मचारी व संशयितांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयितांना अवघ्या काही तासांत जेरबंद देखील केले. त्यानंतर पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पेट्रोल पंपावर भेट दिली व चौकशी केली. म्हसरूळ पोलिसांनी या संशयिताना सात दिवसांची अनोखी शिक्षा केली आहे.

या संशयितांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट न घालता येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करावयाचे आहे. त्यानुसार आजपासून या शिक्षेला सुरुवात झाली आहे. संशयित फलक घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com