शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त; टवाळखोरांचे धाबे दणाणले

शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त; टवाळखोरांचे धाबे दणाणले

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

उत्तम नगर परिसरात धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून पाच ते सहा टवाळखोरांनी एका विद्यार्थ्यावर (students) चाकूने हल्ला (Knife attack) करत जखमी गेले होते.

परिसरात अनेक महाविद्यालयात (college) तसेच शाळा (school) परिसरात टवाळखोर हे मुलींची छेड काढतात तसेच यांना जर कोणी नागरिकांनी हटकले तर त्यांच्या अंगावर धावून जातात अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) पोलीस निरीक्षक नंदन बगाडे (Police Inspector Nandan Bagade) यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवली आहे.

शाळा कॉलेज सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस पोलिसांनी गस्त (Police patrolling) वाढवून टवाळखोरांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्याने आता टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे. अंबड पोलीस खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आले आहे. महाविद्यालय सुटताना या प्रवेशद्वारावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा या अनुषंगाने ठीक ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली होती तसेच मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारून त्यांना चांगलाच चोप देण्यात आला.

ही गस्त कायमस्वरूपी ठेवावी व मोकाट टवाळखोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com