ब्रेंकिंग न्यूज
ब्रेंकिंग न्यूजब्रेंकिंग न्यूज

जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदभरतीस स्थगिती

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल पदभरतीसाठी रविवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी लेखी परिक्षा होणार होती. परंतू सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने पुढील निर्णय येईपर्यंत या पदभरतीला स्थगिती आल्याची माहिती दिंडोरी-पेठ उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल संवर्गातील रिक्तपदाची पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. त्यासाठी पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी रविवार दि. 22 ऑक्टोबर 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

त्यानुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे पोलीस पाटील व कोतवाल हे पद देखील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गाच्या सुचीतील असल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत चालु असलेली पोलीस पाटील व कोतवाल रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत असल्याचे पत्रान्वये जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पोलिस पाटील व कोतवाल पदभरती स्थगिती आली असून पात्र उमेद्वारांनी याची नोंद घ्यावे, असे आवाहन दिंडोरी-पेठ उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com