अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी; कारवाईची मागणी

अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी; कारवाईची मागणी

दिंडोरी |प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) निळवंडी ( Nilvandi )येथील पोलिस पाटील ( Police Patil )अंबादास पाटील यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली असून मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निळवंडी ग्रामस्थ व पोलिस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलिस पाटील अंबादास पाटील हे आपल्या शेतात जनावरे चारत असतांना काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून शेतात आले. त्यांनी पोलिस पाटील अंबादास पाटील यांना लाठी काठ्यानी जबर मारहाण केली. त्यात त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ग्रामिण भागात पोलिस पाटील गावातील वाद गावातच मिटवुन पोलिसांना नेहमीच सहकार्य करत असतात मात्र आता पोलिस पाटलांनांच मारहाण झाल्याने पोलिस पाटलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या मारहाणीचा पोलिस पाटील संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर , तहसिलदार पंकज पवार, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निळवंडी ग्रामस्थ व पोलिस पाटील संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.

पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन मारेकऱ्यांना जेरबंद करावे अशी मागणी निळवंडी ग्रामस्थ व पोलिस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील मोरे, दिंडोरी पंचायत समिती माजी उपसभापती कैलास पाटील यांच्यासह निळवंडी ग्रामस्थ व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com