नाशिक | Nashik

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यास शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 10) सायंकाळी इंदिरानगर बोगदा परिसरात घडला.

नारायण लक्ष्मण सुर्यवंशी (रा. गोविंदनगर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर दातीर (शहर वाहतूक शाखा युनिट 2) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी पोलीस शिपाई शंकर दातीर हे त्यांच्या सहकाजयांसह इंदिरानगर बोगद्याजवळ गस्त घालत होते.

यावेळी मोटारसायकल क्र. (एमएच 15 एचई 6599) वरील चालकाने पोलिसांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे पोलीस कर्मचाजयांनी मोटारसायकल चालकास थांबण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने मोटारसायकलवर पाठिमागे बसलेल्या संशयित सुर्यवंशी याने फिर्यादी पोलीस कर्मचार्यास शिवीगाळ व हाताच्या चापटीने मारहाण केली.

पोलिसांनी संशयित सुर्यवंशी यास अटक करत सोमवारी (दि. 11) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक किरण रौंदळे तपास करत आहेत.