Nashik News : बाजार समितीत टोमॅटो दरवाढीसाठी घोषणाबाजी; पोलीस आले अन् पुढे घडले असे काही...

Nashik News : बाजार समितीत टोमॅटो दरवाढीसाठी घोषणाबाजी; पोलीस आले अन् पुढे  घडले असे काही...

निफाड | प्रतिनिधी | Niphad

टोमॅटोला (Tomato) दरवाढ करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी (Sloganism) करणाऱ्या शेतकऱ्यांवर (Farmers) निफाड पोलिसांकडून (Niphad Police) लाठीमार करण्यात आला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्येही (Citizens) भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांचे हे मॉकड्रील (Mockdrill) असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला...

Nashik News : बाजार समितीत टोमॅटो दरवाढीसाठी घोषणाबाजी; पोलीस आले अन् पुढे  घडले असे काही...
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; दुष्काळी स्थिती मांडताना शेतकऱ्यांना कोसळले रडू

आज शनिवारी (दि. १६) सायंकाळी लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) निफाड उपबाजार आवारात काही शेतकरी अचानक घोषणाबाजी करु लागले. कांद्यासह टोमॅटोला भाव मिळालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याबाबत निफाड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे (Police) बंदुकधारी पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल, रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करुनही आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीचार्ज (Lathicharge) करण्यात आला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली.

Nashik News : बाजार समितीत टोमॅटो दरवाढीसाठी घोषणाबाजी; पोलीस आले अन् पुढे  घडले असे काही...
Nashik News : सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन

दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, आगामी सण - उत्सवांमध्ये संभाव्य दुर्घटना घडल्यास त्यास कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यावे, यासाठी पोलिसांनी निफाड येथील बाजार समिती पटांगणात प्रात्यक्षिक घेतले. याचा एक भाग म्हणून सदर प्रात्यक्षिक राबविण्यात आल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू महाजन यांनी पोलिसांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सायखेडा, लासलगाव पोलीस ठाण्याचे (Lasalgaon Police Station) अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : बाजार समितीत टोमॅटो दरवाढीसाठी घोषणाबाजी; पोलीस आले अन् पुढे  घडले असे काही...
Eknath Shinde : "राऊत नाही आले का?"; मुख्यमंत्री शिंदेंचा भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांना खोचक टोला
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com