गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन
पोलिसांचे संचलन

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

गणेश विसर्जनाच्या (Ganesh Idol Immersion) पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) भगूर (Bhagur), देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात संचलन (March Pass) करीत कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली...

विभाग 4 चे सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख (Sameer Saikh), व व पोनि कमलाकर जाधव (Kamlakar Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली आज देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन (Deolali Camp Police Station) येथून संचलनास सुरुवात करण्यात आली.

भगूर परिसरात मेनरोड, शिवाजी चौक, मारवाडी गल्ली, राम मंदिर रोड, भगूर नगरपालिका, करंजकर गल्ली, भगूर पोलीस चौकी व देवळाली कॅम्प शहरात सिलेक्शन कॉर्नर, हौसन रोड, जुने बस स्टॉप, झेंडा चौक, लेविट मार्केट ते पोलीस ठाण्यापर्यंत संचलन घेण्यात आले.

यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोनि डोंबरे, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सह. पोनि प्रकाश गिते, राहुल मोरे, पोउनि वैशाली मुकणे, संदेश पाडवी आदींसह कर्मचारी सहभागी झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com