इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे जवळील रायगड नगर परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातामध्ये मुंब्रा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी हे ठार झाले.

खांडवी हे स्वतः इरटीगा कारने सुरगाणा तालुक्यातील आपल्या मूळ गावी जात होते. मुंब्राहुन नाशिककडे जात असतांना रायगड नगर परिसरात अज्ञात वाहनावर मागून जाऊन आदळले. या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाले.

जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. तर त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतय. या अपघाताचा तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत.