नागरिकांकडून पोलिसांचा सत्कार

नागरिकांकडून पोलिसांचा सत्कार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दोन महिन्यापुर्वी निळवंडी ( Nilvandi )येथील पोलिस पाटलांवर झालेल्या प्राण घातक हल्ल्याने अवघ्या तालुक्यात खळबळ उडाली होती. कोणताही सुगावा नसतांना दिंडोरी पोलिसांनी योग्य तपास करुन गुन्हेगारांना गजाआड टाकून पोलिसांचा धाक कायम ठेवला. यामुळे दिंडोरी पोलिसांचे कौतुक करत निळवंडी ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य गाव कामगार संंघाच्या वतीने दिंडोरी पोलिसांचा ( Dindori Police )नागरी सत्कार करण्यात आला.

दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक चेतन लोखंडे, पांडूरंग कावळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लहारे, पोपट नवले, बाळासाहेब पानसरे, संदिप कडाळी, सुमित आवारे, बाळासाहेब कावळे, अमोल साळवे, अविनाश आहेर, मधुकर बेंडकूळे, हेमंत पवार, विशाल पैठणकर, बोंबले, वाघ आदींचा नागरी सत्कार करण्यात आला.

गुन्हेगारांना अटक करुन गुन्हेगारी प्रवृतींना चाप बसविण्याचे कार्य दिंडोरी पोलिसांनी केले आहे. निळवंडी येथील पोलीस पाटील शांत व संयमी स्वभावाने परिचित असतांना त्यांच्यावर प्राण घातक हल्ला कोण करु शकतो ? या विवंचनेत प्रत्येकजण सापडला होता. हल्ला होवून देखील संशय कुणावर घ्यावा, असा प्रश्‍न कुटूंबियांना देखील पडला होता. परंतू कोणताही सुगावा नसतांना दिंडोरी पोलिसांनी विशेष कामगिरी केली. यात विशेषत: वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल चेतन लोखंडे यांचे विशेष कौतुक गावच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे गाव कामगार संंघाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, निळवंडीचे सरपंच एकनाथ डंबाळे, बाजार समितीचे माजी संचालक मच्छिंद्र पवार, पत्रकार भगवान गायकवाड आदींनी आपल्या मनोगतात दिंडोरी पोलिसांचे विशेष कौतुक करुन खाकीचा धाक हा कायम असाच राहु द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास संदिप पाटील, रामदास पाटील, सुनील पाटील, कचरु पाटील, भाऊसाहेब पाटील, रविंद्र पाटील, दिलीप पताडे, सोमनाथ पाटील, गुलाबराव पाटील, संतोष पाटील, सोमनाथ पाटील, रोहिदास पाटील, नामदेव पवार, रमेश पाटील, सुभाष पाटील, भास्कर पताडे, शिवाजी पताडे, गणेश हिरे, अंबादास पाटील, कारभारी चौधरी, जयराम भवर, देवराम बोरस्ते, कचरु पवार, शाम पाटील, सुनील लोखंडे, किशोर अपसुंदे, निवृत्ती अपसुंदे, संजय आंबेकर, पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ मुळाणे, उपाध्यक्ष संजय धात्रक, सौ.अर्चना अनवट, सीमा ढगे, चित्रकला पाटील, स्वाती कळमकर, सम्राट पाटील, पंडीत दवंगे, राजेंद्र राऊत, मुरलीधर पवार, अशोक सांगळे,रामनाथ पाटील, वामनराव पाटील, वसंत परदेशी, किरण निरघुडे, वडजे, सम्राट राऊत, नारायण अपसुंदे, रोशन परदेशी, आदींसह पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, पोलिस वर्ग, निळवंडी, हातनोरे, मडकीजांब, पाडे, जांबुटके आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चिंतामण मोरे पाटील यांनी केले तर आभार संदिप अंबादास पाटील यांनी मानले.

गुन्हेगाराने कितीही चालाखी केली तरी पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले. सुगवा नसला तरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमीदार गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत गुन्हेगारांना गजाआड करण्यास आम्हाला यश आले. हे आमच्या सर्व टीमचे यश असून त्याच्या कौतुकाची थाप आम्हास मिळत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. यापुढेही गुन्हेगारांना योग्य शासन करण्यास दिंडोरी पोलिस नेहमी अग्रेसर असतील याची खात्री देखील मी पोलिसांच्या वतीने देतो.

चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक, दिंडोरी

निळवंडी येथील पोलिस पाटलांवर झालेला प्राण घातक हल्ला हा नक्कीच निदणीय होता. कोणताही सुगवा नसल्याने गुन्हेगार गजाआड होतील की नाही? याविषयी शाशंकता निर्माण झाली होती. परंतू दिंडोरी पोलिसांनी योग्य पध्दतीने तपास लावत गुन्हेगारांना गजाआड करुन कायद्याचा धाक कायम ठेवला. पोलिस पाटलांना देखील योग्य तो न्याय मिळवून दिल्याबद्दल मी समस्त पोलिस पाटील संघटनेच्या वतीने पोलिसांचे आभार मानतो.

चिंतामण मोरे पाटील, अध्यक्ष गाव कामगार संंघ सल्लागार समिती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com