
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गुंगीची गोळी खायला देत तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो (pornographic photos) काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फिर्यादी पीडित तरुणीशी संशयीत मनोज जगताप (वय २७, रा. त्रिमूर्ती चौक) याने मैत्री केली. त्यानंतर सप्टेंबर २०२२ ते १६ मार्च २०२३ या कालावधीत आरोपी मनोज जगताप याने पीडित तरुणीला शिवाजीवाडी, इंदिरानगर बोगद्यानजीक व त्याच्या राहत्या घरी गुंगीची गोळी खायला देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual assault) केले. तसेच तिला शिवीगाळ करून धमकी दिली.
तरुणीने त्याला नकार दिला असता त्याने पीडित तरुणीचे काढलेले खासगी अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करून पीडित तरुणीची बदनामी केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार संशयितास अटक करण्यात आली आहे.