आयुक्तांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

आयुक्तांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत Nashikroad & Upnagar Police Station विविध घरफोड्यांतील एकूण ८८ तोळे सोने पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास police skillfull investigation करून पुन्हा मिळवले.

तपास करणार्‍या पोलिसांचा सत्कार नाशिकरोड पोलिस ठाण्यात आयुक्त दीपक पांड्ये यांच्याहस्ते आज करण्यात आला. 32 तोळे घरफोडीचा तपास लावणार्‍या पोलिस पथकाला आयुक्तांनी रोख वीस हजाराचे पारितोषिक जाहीर केले.यावेळी उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निलेश माईनकर, कुंदन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिस आयुक्त म्हणाले की, इंग्लंड, अमेरिकेत घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येत नाहीत. मात्र, भारतीय पोलिस जीवाची बाजी लावून छडा लावतात. गुन्हेगार आज ना उद्या ताब्यात येतील. पण तपास करताना पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालू नये. सिंघम होण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांवरच या खात्याची कमान अवलंबून असते, टीमवर्क, कुशल नेतृत्व, उच्च मनोबल या जोरावर खाकी काय करू शकते हे आज दिसून आले आहे.

पोलिस खाते जेवढी समाजसेवा करते तेवढे अन्य कोणीही करत नाही. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी. उत्तम आरोग्यामुळेच समाजाला चांगला पोलिस मिळतो. आगामी एक वर्षात पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस आणि त्याच्या कुटुंबांना रोगमुक्त करण्याचा भारतातील पहिला उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने 18 जानेवारीपासून निसर्गोपचार शिबिर सुरु केले जाणार आहे.

यांचा झाला सत्कार

वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहाळदे, राजू पाचोरकर, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, मनवीर परदेशी, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, हवालदार अनिल शिंदे, राजेश साबळे, सुभाष घेगडमल, अविनाश देवरे, विशाल पाटील विशाल पाटील, विष्णू गोसावी, अविनाश जुंद्रे, संदीप बागल, महेंद्र जाधव, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, केतन कोकाटे, कुंदन राठोड, हेमंत मेढे, विशाल कुवार, समाधान वाजे, अजय देशमुख, नीलेश विखे, विनोद भोर, स्नेहल सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com