इंदिरानगर l Indira nagar (वार्ताहार)

इंदिरानगर परिसरात दहशत माजविणारे चार संशयीत आरोपींची पोलिसांनी धिंड काढली सदर संशयित आरोपींवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

निलेश इंगळे उर्फ सोनू महाजन (रा. म्हाडा कॉलनी, समर्थ नगर), निलेश उर्फ बापू भुरे (रा. कैलास रो हाऊस वासनगर), रवींद्र शिवदास भवर (रा. आनंदनगर), गणेश लीपने (रा. आनंदनगर) वरील संशयित आरोपींची समर्थ नगर, म्हाडा वसाहत, वासन नगर, आनंद नगर, पाथर्डी फाटा या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली.

त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत असलेली भीती कमी व्हावी म्हणून सदर आरोपींची परिसरातून धिंड काढण्यात आली. या संशयित आरोपी बाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर इंदिरानगर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी केली आहे सदर कार्यवाही स. पो. नी. राकेश भामरे, स. पो. नी. निखिल बोंडे, पो.उ.नी बाकले पटेल, सावंत, वसावे, परदेशी यांनी केली.