Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुस अन्य हत्यार हस्तगत
Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

मागील आठवड्यात मखमलाद रोडवरील (Makhmalabad Road) जगझाप मार्गावरील गुंजाळ मळ्यात सागर शिंदे या युवकाची (Youth) १२ जणांच्या टोळक्याने निर्घृण खून (Murder) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली असून यातील एक जण अल्पवयीन आहे. तर इतर चारजण अद्याप फरार असून या खुनाच्या घटनेत संशयितांनी (Suspects) वापर केलेला कोयता, चॉपर, दोन स्टील रॉड व दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्टल पोलिसांनी (Police) हस्तगत केले आहेत...

Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
Rajasthan Assembly Elections : काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजे 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.१३) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून सागर विष्णू शिंदे या युवकाचा खून झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात संशयित केदार साहेबराव इंगळे, ऋषिकेश रामचंद्र आहेर, नकुल सुरेश चव्हाण व दिपक सुकदेव डगळे हे चौघे पळून जात असताना पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) कसबे सुकेणे येथून अटक केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे तपास करीत आहेत.

या खुनाचा कट रचताना महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमा भागातून दोन पिस्टल आणण्यात आले होते. हे पिस्टल बाळगणारे संशयित गौरव दिलीप उन्हवणे व किरण सुखलाल केवर (दोघेही राहणार हिरावाडी, पंचवटी) यांना पोलिसांनी शिताफीने अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून सागर शिंदे खुनाच्या घटनेत वापरलेले दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्टल हस्तगत केले. यासह खुनात वापरलेला कोयता,चॉपर,दोन स्टीलचे रॉड देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
Nashik Crime News : भाजपच्या माजी नगरसेवक मुलावर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, अद्याप फरार असलेले संशयित केतन वराडे, रोहित उर्फ झिंप्या मुर्तडक, मच्छिंद्र जाधव, घोलप यश पवार,संकेत गोरे (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्या शोधार्थ तपास पथके रवाना करण्यात आली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.

Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
Gaganyaan Mission Test : इस्रोचे मोठे यश! 'गगनयान' अवकाशात यशस्वीपणे झेपावलं

यांनी बजाविली कामगिरी

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सपकाळे, पोलिस निरीक्षक प्रशासन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, दिनेश खैरनार, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलिस हवालदार डी.बी. शेळके,सागर कुलकर्णी, संतोष जाधव, पोलिस नाईक यतिन पवार, दिपक नाईक, कैलास शिंदे, राकेश शिद, एस.एस. बाकिर, एस.डी.गांगुर्डे, रोहिदास लिलके, पोलिस अंमलदार गौस साबळे, घनशाम महाले,  श्रीकांत कर्वे, आर. आर. गुंजाळ, टी.बी. मोफल,  कैलास वाकचौरे, वाहनचालक के. आर.महाले, जाधव, नितीन पवार अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : 'त्या' खूनप्रकरणी आतापर्यंत सात संशयित ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
इंदिरानगर वरिष्ठ निरीक्षकांवर वरदहस्त कोणाचा?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com