नाशिककरांनो हेल्मेट घाला, नाहीतर...; पोलीस आयुक्तांचा गंभीर इशारा

हेल्मेट शोभेसाठीच आहे का?
हेल्मेट शोभेसाठीच आहे का?

नाशिक / नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात आता पुन्हा एकदा हेल्मेट (Helmet) सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती केली जाईल. सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेट न वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी दिला आहे...

नाशकात पोलीस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील हेल्मेटसक्ती बंद करण्यात आली होती. तुरळक ठिकाणी हेल्मेट तपासणी करण्यात येत होती.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीचालकांना तब्बल दोन तासांचे समुपदेशन, नो हेल्मेट नो एन्ट्री आणि नंतर नो हेल्मेट नो पेट्रोल असे विविध उपक्रम राबवत नाशकात हेल्मेटसक्ती केली होती. त्यांच्या बदलीनंतर हेल्मेट सक्तीची कारवाई थंडावली.

आता पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे 83 चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले, यामुळे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कठोर भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे.

हेल्मेट शोभेसाठीच आहे का?
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दरम्यान, आता या हेल्मेट सक्तीच्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, असेही वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकामध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेल्मेट शोभेसाठीच आहे का?
संतापजनक! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलिसांनी हेल्मेट सक्तीपेक्षा नागरिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे हेल्मेट सक्ती केल्यास अनेक वाहनधारकांना नाहक दंड भरावा लागतो त्या ऐवजी पोलिसांनी गुन्हेगारी संपुष्टात आणावी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी शहर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा. त्याचप्रमाणे हेल्मेट सक्ती करून दंड आकारण्यापेक्षा वाहनचालकामध्ये जनजागृती करावी.

- मनोहर कोरडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकरोड विभाग.

येत्या एक डिसेंबर पासून वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती होणार असल्याने वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हेल्मेट परिधान केल्यावर अपघातांनाही आळा बसेल.

दिनकर कदम वाहतूक पोलीस निरीक्षक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com