शेकोटीमुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची चौकी जळून खाक

शेकोटीमुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची चौकी जळून खाक

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

पहाटेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गारवा असल्याने गारव्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काही टवाळखोरांनी बिटको चौक येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ शेकोटी पेटवली. या शेकोटीची आग चौकीला लागल्याने चौकी काही क्षणात जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेकोटी करणाऱ्या टवाळखोरांचा पोलीस शोध घेत आहे...

याबाबतचे वृत्त असे की, बिटको चौक येथील उड्डाणपुलाखाली वाहतूक शाखेची पोलीस चौकी आहे. बिटको चौकातील वाहतुकीवर नियंत्रण राहावे म्हणून पोलीस चौकी सिंहस्थ काळात ठेवण्यात आली होती.

ही चौकी पूर्णपणे प्लास्टिक फायबरची आहे. या पोलीस चौकीत वाहतूक शाखेच्या पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्या टेबल व पंख्याची व्यवस्था होती. गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हामुळे नागरिक त्रस्त होतात, मात्र रात्री व पहाटेच्या दरम्यान थंडी व गारवा सुटतो.

शेकोटीमुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची चौकी जळून खाक
Women T20 World Cup : सामन्याआधीच भारताला मोठा धक्का; 'ही' खेळाडू सेमी फायनलमधून बाहेर

आज पहाटे मोठ्या प्रमाणात गारवा असल्याने साधारण सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास या ठिकाणी आजूबाजूला असणारे फिरस्ते व काही टवाळखोर एकत्र आले. त्यांनी बाजूला असलेला केरकचरा गोळा करून चौकीच्या बाजूला ठेवला.

शेकोटीमुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची चौकी जळून खाक
बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

त्यानंतर शेकोटी पेटवली. परिणामी शेकोटी ही चौकीच्याच खेटून असल्याने अचानकपणे चौकीच्या खालील व दुसऱ्या बाजूने पेट घेतला. त्यामुळे शेकोटी घेणारे टवाळखोर घाबरले व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

परंतु पहाटेच्या वेळी आजूबाजूला कुठे पाणी मिळाले नाही. त्यामुळे आगीने उग्र स्वरूप धारण केले. दरम्यान सदरची घटना एका रिक्षा चालकाने नाशिकरोड पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण केले. पण, तोपर्यंत पोलीस चौकी मोठ्या प्रमाणात जळून गेली.

शेकोटीमुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांची चौकी जळून खाक
शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू

अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष निकम, मनोज साळवे, विजय बागुल, रामदास काळे, श्रीरंग खडके आदी तातडीने पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविली. या आगीत चौकीतील टेबल, खुर्ची, पंखा व कपाट जळून खाक झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com