करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

दिंडोरी : कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली फिर्याद

Abhay Puntambekar

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

तालुक्यातील पालखेड एमआयडीसीतील हायमीडिया या औषध कंपनीत करोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कंपनीच्या व्यवस्थापणाविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानन्तर पारदर्शक कार्यपद्धतीमुळे पोलीस,महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे आर्थिक हव्यासापोटी हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

पालखेड एमआयडीसी मधील हायमेडिया या औषध निर्मिती कंपनीत २४ जुलै ला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला.त्यांनतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ,पोलीस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती.कंपनी सुरूच राहिली.कंपनी बसेस ने कर्मचारी नाशिक येथून ये जा करीत राहिले. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही.

कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगार काम करत राहिले.परिणामी ४४ कामगार बाधित झाले . शासनाच्या नियम आदेशाचे पालन न करता हयगय करत संक्रमण वाढण्यास जबाबदार धरत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र रसाळ,प्रवीण भोळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी जबाबदार व्यवस्थापना विरोधात साथ रोग प्रतिबंध,कोविड- १९ उपाययोजना,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप निरी.अरुण आव्हाड आदी करीत आहेत.

या घटनेनंतर उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.लाखमापूर फाटा येथील एव्हरेस्ट कंपनीत ४७ कामगार ही व्यवस्थापणाच्या निष्काळजीपनामुळे बाधित झाले आहे.त्यात पत्रे वाहतूक करतांना वाहनचालक यांची खबरदारी घेतल्या जात नाही.त्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची भिती वाढली आहे.एव्हरेस्ट कंपनी व्यवस्थापणाविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com