मास्क लावण्यास सांगितले म्हणून टोळक्याकडून पोलिसावर हल्ला
नाशिक

मास्क लावण्यास सांगितले म्हणून टोळक्याकडून पोलिसावर हल्ला

म्हसरूळ परिसरातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

करोनाचा प्रसार वाढत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रस्त्याने विना मास्क फिरणार्‍या टोळक्यास मास्क लावण्यास सांगितल्याने संतप्त टोळक्याने पोलीस कर्मचार्‍यास मारहाण केल्याची घटना म्हसरूळ परिसरातील पुष्पक नगर भागात घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाला असून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज गोकुळ लांडे (रा. विश्वकर्मा अपा. पुष्पकनगर), सुशांत संतोष खरे (रा. साई श्याम अपा. पुष्पकनगर), फैजल कय्युम शेख व विठ्ठल राजाराम साळवे (रा. दोघे विश्वेश्वरी अपार्टमेंट, पुष्पकनगर) अशी पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करणार्‍या संशयीत चौकडीचे नाव आहे. याप्रकरणी जिभाऊ पंडू चौरे (रा.पुष्पकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस कर्मचारी असलेले चौरे शनिवारी (दि.18) रात्री सेवा बजावून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली.

वाटेत चार जणांचे टोळके रस्त्याने विना मास्क फिरतांना दिसल्याने त्यांनी संबधीतांना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संतप्त टोळक्याने चौरे यांच्यावर दगड फेक करून जखमी केले. तसेच त्याच्या गणवेशही फाडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एस.वाय.पाटील करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com