जिल्हाधिकारी कार्यालयास पोलीस बंदोबस्त तैनात

रेमडिसिव्हरसाठी गर्दी : करोना फैलावाचा धोका
जिल्हाधिकारी कार्यालयास पोलीस बंदोबस्त तैनात
जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक । Nashik

रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाई थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत असून नियंत्रण कक्षाबाहेर बाहेर मोठी गर्दी होत आहे.

रेमडिसिव्हरसाठी नातेवाईकांकडून अधिकाऱ्यांकडे हुज्जत घातली जात असल्याने वादविवादचे प्रकार घडून लागले आहे. करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईकच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेटा मारत असल्याने करोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

हे सर्व टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव दलाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्ह्यात रेमडेसिवीरचाही मोठा तुटवडा निर्माण झाला असून कोटा पध्दतीने देखिल रुग्णालयात इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहे.

जिल्ह्यास दहा हजार रेमडेसिवीरचा कोटा मंजूर करण्यात आला असताना रोज हजार ते दीड हजार इंजेक्शनही प्राप्त होत आहे. सद्यस्थितीत ७ हजार रुग्ण आॅक्सिजन बेडवर असून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. काळा बाजार सुरु झाला.

हा काळाबाजार रोखण्यासाठी वितरकांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांवर केंद्रीय पध्दतीने इंजेक्शन वितरणाचे आदेश शासनाने दिले आहेत. रुग्णालयांनी त्यांची मागणी आॅनलाईन पध्दतीने जिल्हाप्रशासनाकडे नोंदवायची. जिल्हाप्रशासन त्यांच्याकडे उपलब्ध कोट्यानूसार त्याचे वाटप करेल, अशी पध्दती ठरली. शिवाय २४ भरारी पथकेही नेमण्यात आली.

पण प्रचंड तुटवड्यामुळे जिल्ह्याला आवश्यकतेपेक्षा कमी रेमडेसिवीर मिळत आहे. गरजू रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकही अधिकाऱ्यांकडे त्यासाठी आग्रह धरत आहे. त्यातून अधिकाऱ्यांचीही अडचण वाढल्याने प्रसंगी ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. परंतू वारंवार ही गर्दी होत असल्याने अखेर गुरुवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच पोलीसांचा बंदोबस्त तैनाक करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com