घरफोडी करणारा गजाआड, 'इतक्या' किमतीचे दागिने हस्तगत

घरफोडी करणारा गजाआड, 'इतक्या' किमतीचे दागिने हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरफोडी (Robbery) करणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) गुन्हे शोध पथकास मोठे यश आले आहे. संशयिताकडून ९ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे संशयिताला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ सप्टेंबर रोजी मीरा शशिकांत गंभीरे (५०, ध्रुव नगर, गंगापूर शिवार, नाशिक) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाच्या लॉकची चावी अज्ञाताने चोरली. त्या चावीने लॉक उघडून घरातून सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

घरफोडी करणारा गजाआड, 'इतक्या' किमतीचे दागिने हस्तगत
दांडिया खेळू न दिल्यामुळे राग अनावर, तिघांवर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत संशयित आलोक दत्तात्रेय सानप (२३, रा. मखमलाबाद) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. संशयिताकडून ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करणात आले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com