Nashik Dindori Crime News : बापानेच दिली मुलाची सुपारी; पालखेड येथील खुनाचा उलगडा

Nashik Dindori Crime News : बापानेच दिली मुलाची सुपारी; पालखेड येथील खुनाचा उलगडा

दिंडोरी |  प्रतिनिधी | Dindori

दारूच्या (Alcohol) आहारी जात सतत दारु पिऊन पैशाची (Money) मागणी शिवीगाळ व धमकी देणाऱ्या मुलाला बापानेच सुपारी देवून ठार मारल्याचे निष्पन्न झाले असून लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरण परिसरात झालेल्या खडकजांब येथील युवकाच्या खुनाचा (Murder) छडा लावण्यात वणी व ग्रामीण पोलिसांना अवघ्या बारा तासात यश येत एक विधी संसर्गित बालकांसह दोन जणांना अटक (Arrested) केली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, खडकजांब येथील किशोर उर्फ टिल्लू दगु उशीर खून प्रकरणी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण संजय बांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे पोलीस निरीक्षक निलेश बोडके,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे व पथकाने कोणताही पुरावा नसताना सदर खून प्रकरणी संदीप छगन गायकवाड (वय ३०) व त्याचा सोळा वर्षीय साथीदार रा. खडकजांब यास अटक केली होती.

यानंतर त्यांच्याकडे सखोल तपास केला असता खून झालेल्या युवकाचे वडील दगु जयराम उशीर यांनी मुलगा हा दारू पिऊन सतत पैसे मागतो शिवीगाळ करतो धमक्या देतो या छळाला कंटाळून सदर आरोपींना मुलास मारण्याची १८ हजार रुपयाची सुपारी दिल्याचे निष्पन्न केले.

दरम्यान, वडील व खून करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून विधी संसर्गित बालकाला बाल सुधारगृहात पाठवले आहे.तर सदर खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल तपासी वणी व ग्रामीण पोलिस (Police) पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com