नाशकातील 'त्या' खुनाचा पोलिसांकडून उलगडा

नाशकातील 'त्या' खुनाचा पोलिसांकडून उलगडा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

चार दिवसांपूर्वी शहरातील मखमलाबाद लिंक रोडवरील (Makhmalabad Link Road) समर्थनगर जवळील मोकळ्या जागेत ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर, नाशिक) नामक तरुणाचा मृतदेह (Dead Body) विचित्र अवस्थेत आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांना (Police) हत्येचा संशय आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असता याप्रकरणातील आरोपींना शोधण्यात यश आले आहे...

हमालवाडी (Hamalwadi) जवळील आर के होरायझन बिल्डिंगसमोरील जागेत शनिवार (दि २०) सकाळी एका अज्ञात तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी पाहणी करुन पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. त्यावेळी तपास सुरू असतांना पोलिसांनी मिसिंगच्या नोंदींचा तपास केला. तेव्हा सातपूर येथुन ऋषिकेश भालेराव बेपत्ता असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटविली. यांनतर गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत पुढील तपास केला होता.

मयत ऋषिकेश हा रात्री सातपूर येथून जात असतांना त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना अशोक स्तंभापर्यंत लिफ्ट मागितली. तेथे पोहोचल्यानंतर त्याने आरोपींना मखमलाबाद रोड येथे सोडण्याची मागणी केली. त्यावरून त्या दोघांनी समर्थ नगर येथे त्याला सोडले. असता गाडीवरून उतरल्यानंतर ऋषिकेशने दोन्ही आरोपींकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. यावरून त्या तिघांमध्ये वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात आरोपींनी मयत ऋषिकेशला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून रागाच्या भरात ऋषिकेशच्या डोक्याला दगडाने ठेचून काढले व यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी तेथून फरार झाले व त्यांनी थेट मुंबई (Mumbai) गाठली. या क्लिष्ट गुन्ह्याचा पंचवटी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत छडा लावला.

दरम्यान, याप्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना (Accused) पकडण्यात पोलीसांना यश आले असून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक (Arrested) केली असून पुढील तपास पंचवटी पोलिस करत आहेत. तसेच ही कारवाई पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक गुन्हे युवराज पतकी आदीसह गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या अधिकाऱ्यांनी बजावली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com