अंबड औद्योगिक वसाहतीत चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

अंबड औद्योगिक वसाहतीत चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad MIDC) एका कंपनीत चोरी केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका संशयितासह चार विधिसंघर्षित बालकांना सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं एच ३२ मधील वैभव इंडस्ट्रिज या कंपनीत (दि.१३ ते १४ ऑगस्ट) दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका मशीनसह लोखंडी भाग असा ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अंबड औद्योगिक वसाहतीत चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या
टोल नाक्यावर पोलीस अधीक्षकांची गाडी अडवली

याप्रकरणी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,उपायुक्त विजय खरात,सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अज्ञात चोरट्यांच्या मागावर असतांना पोलीस शिपाई योगेश शिरसाठ व मुकेश गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित गुणवंत भाऊसाहेब बळसाणे व ०४ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.

अंबड औद्योगिक वसाहतीत चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या
मुंबईला उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून मेसेज आल्याने खळबळ

त्यांच्याकडून गुन्ह्यातील ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सपोनि गुन्हे गणेश शिंदे,पोलीस शिपाई योगेश शिरसाठ,मुकेश गांगुर्डे, तुषार देसले,प्रविण राठोड, किरण सोनवणे, प्रशांत नागरे आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास हवालदार जितेंद्र परदेशी व पोलीस शिपाई अमीर शेख करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com