व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही; अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालकास जीवदान

व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही; अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालकास जीवदान

ओझे | वार्ताहर

नाशिक-कळवण रोडवरील वनारवाडी गावाजवळ आयसर व बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक पूर्णपणे गाडीत अडकला होता. यावेळी घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका तसेच परिसरातील नागरिक दाखल झाले यानंतर या चालकाला क्रेनच्या साहाय्याने गाडीचे अनेक पार्ट वाकवून या चालकाच्या पुढील काचेच्या बाजूने बाहेर काढण्यात यश आले.

समाधान जाठ असे गंभीर जखमी असलेल्या चालकाचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला संपर्क केला. यानंतर स्थानिक नागरिकांनी या चालकाला काढण्यासाठी प्रयत्न केले.

दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांनी तत्काळ उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण व पथकाला घटनास्थळी पाठवले.

यानंतर ट्रक चालक जाठ याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com