नाशकात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पुन्हा कारवाई

नाशकात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पुन्हा कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात बुधवारी विविध ठिकाणी दोन नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्रेत्यांवर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने कारवाई (Action) करत गुन्हे दाखल केले आहेत...

गंगापूररोडवरील (Gangapur Road) राठी आमराई परिसर (Rathi Amrai Area) आणि मखमलाबाद रोड (Makhamalabad Road) या दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गौरव रमेश फरताळे (३२, तांबेमळा, शांतीनगर) हा मखमलाबाद रोडवरील शांतीनगर (Shantinagar) येथे प्रतिबंध असलेल्या मोनो काईट कंपनी नायलॉन मांजा विकत होता. फरताळे याच्याकडे मांजा सापडल्याने त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच गंगापूर रोडवरील आमराई परिसरात प्रथमेश प्रफुल्ल तांबोळी (१९, ओम श्रीसाई अपार्टमेंट, गंगापूर रोड) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री साई अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भिंतीच्या आडोशाला काचेचे कोटिंग असलेले प्रतिबंधक मांजाचे १९ हजार ६०० रुपयांचे २८ गट्टू पोलिसांना आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com