बायोडिझेल विक्री अड्डे उध्वस्त

विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची कारवाई
बायोडिझेल विक्री अड्डे उध्वस्त

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुंबई-आग्रा महामार्गावरील Mumbai- Aagra Highway स्टार हॉटेललगत असलेल्या भावना रोड लाईन्स नावाच्या निळ्या पत्राच्या गोदामामध्ये अवैधरित्या सुरू असलेला बायोडिझेल विक्रीचे illegal sales of Biodiesel दोन अड्डे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर Special Inspector General of Police Dr. B.G. Shekhar यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने महसुल विभागाच्या अधिकार्‍यांसह छापा मारून उध्वस्त केले.

या कारवाईत 23 हजार 200 लिटर बायोडिझेल सदृष्य द्रव्यासह ट्रक व इतर साहित्य असा सुमारे 43 लाख 36 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवक एजाज बेग यांच्यासह पाच जणांविरूध्द पवारवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. छाप्यानंतर फरार झालेल्या गोदाम मालक नगरसेवक बेग व जुबेर खान यांचा शोध पोलीस पथकातर्फे घेतला जात आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखांनी काही दिवसांपुर्वीच छापा मारून बायोडिझेलच्या अवैध विक्रीचा अड्डा उध्वस्त केला होता. मात्र या कारवाईनंतर देखील बायोडिझेलची अवैध विक्री महामार्गावर सुरूच होती. या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याने त्यांचे विशेष पथकातील सपोनि सचिन जाधव यांच्या पथकाने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना या संदर्भात माहिती देत महसुल अधिकार्‍यांना सोबत घेत हा छापा मारला.

महामार्गावर नगरसेवक एजाज बेग यांच्या मालकीच्या भावना रोडलाईन्स नामक गोदामावर पथकाने छापा मारला असता एका टँकरमधून बायोडिझेल सदृश्य इंधन पंपाच्या साहाय्याने काढताना शेख अनिस शेख रशीद (36, रा. गुलशेर नगर, मालेगाव) हा मिळून आला. मालवाहू वाहनांमध्ये इंधन म्हणून भरण्यासाठी हे द्रव्य ड्रममध्ये साठवत असल्याचे तसेच सदर पंपाचे एजाज बेग अजीज बेग हे मालक असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. याप्रकरणी नायब तहसीलदार डी.बी.वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाने जवळचं जे.के. मोटर्सच्या पाठीमागे असलेल्या एका पत्राच्या गोडावूनमध्येही पाहणी केली असता या ठिकाणी जावीद खान अहमद खान (39, रा. चमन नगर, आझादनगर) व शहजाद खान सलीम खान (24, रा. राजा नगर, मालेगाव) हे दोघे देखील ड्रममध्ये इंधन भरताना आढळून आले.

सदर इंधन जुबेर खान नासीर खान याचा असल्याचे सांगितले. जुबेर खान देखील फरार आहेत.पथकाने दोन्ही गोडावून सील केले आहेत. त्यातील ड्रम, टँकरमध्ये 23 हजार 200 लिटर बायोडीजेल सदृश्य विस्फोटक द्रव्य, अप्रमाणित मशीन असा 43 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com