अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

महिलांचाही समावेश
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

चिंचखेड | Chinchkhed

वणी पोलिसांनी गस्त घालत असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरू आहे. अशा परिस्थितीत वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोल्हेर, गोलदरी या गावात अवैधरित्या गावठी मद्य विक्री करताना दोघेजण आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच कादवा कारखाना जवळ बोपेगाव शिवारात लोखंडे नामक महिला, वरखेडा येथील यादव गोतीसे नामक महिला अवैधरित्या देशी प्रिन्स संत्रा दारूची विक्री करीत असताना आढळून आल्या. या सर्वांवर वणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहोत. कोणाचीही गय केली जाणार नाही. निर्बंध मोडाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल.

- स्वप्निल राजपूत-पोलीस निरीक्षक, वणी पोलीस ठाणे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com