बेफिकीरांवर सव्वातीन लाखांची दंडात्मक कारवाई

रस्त्यावरच अँटेजीन चाचण्यांचा धडका, पोलीसांकडून दिवसभर कसून चौकशी
बेफिकीरांवर सव्वातीन लाखांची दंडात्मक कारवाई

नाशिक । Nashik

शहरात करोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीसांनी संचार बंदीच्या कडक अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. मागील दोन दिवसात ५३३

बेफिकीर नागरीकांवर पोलीसांनी कारवाई करत ३ लाख २१ हजाराचा ५०० दंड वसुल केला. तर आज दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर तपासणी तसेच कारवाई सुरू होती. तर विनाकारण फिरणारांची जागेवरच कोरोना चाचणी घेण्याचा धडाका लावला आहे.

जिल्हा तसेच राज्यभरात कोरानाचा वाढता उद्रेक पाहता राज्य शासनाने १५ दिवसांच्या संचार बंदीची घोषणा केली आहे. शुक्रवारी रात्री पासून शहरभर

कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहनांच्या तपासण्यांबरोबरच विनाकारण फिरणार्‍या तरूणांची चौकशी करून त्यांच्या तातडीने जागीच कोरोना चाचण्या केल्या जात आहे. शहरात येणार्‍या सर्व मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत अशा विविध ३८ ठिकाणी बॅरेकेंडींग करण्यात आले आहे. यासह शहरातील भाजीपाला मार्केट, बाजारपेठा, वाहतुक तसेच शहरातील गर्दी होणार्‍या प्रमुख ठिकाणांवर चेकपॉंईंट तयार करण्यात आले आहेत. यासह त्या त्या पोलीस

ठाण्याअंतर्गत नागरीकांना ध्वनीक्षेपाद्वारे सातत्याने आवाहन करण्यात येत असून विनाकारण फिरताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. असे असले तरी अनेक नागरीक विनाकारण भटकताना दिसत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह वाढण्यात नाशिकचा देशात प्रथम कमांक आला आहे.

हे रोखण्यासाठी अखेर शुक्रवारी रात्री पासून पोलीसांनी कडक कारवाई सुरू केली असून विनामास्क फिरणार्‍या ३७५ जणांवर कारवाई करत १ लाख ६५ हजार ६००, सामाजिक अंतर न पाळणारे ११ जणांना ११ हजार दंड, संचारबंदी नियम तोडणार्‍या २३ अस्थापनांना ५२ हजार ५००, संचार बंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या १२४ जणांना ८५ हजार सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या ८ जणांना ७ हजार असा एकुण

१९ जण सुपरस्प्रेडर

पोलीसांनी विनाकारण बाहेर भटकाणार्‍या नागरीकांवर कडक कारवाई सुरू केली असून विनामास्क, सामाजिक अंतर न पाळणार्‍या ५३३ नागरीकांवर कारवाई केली आहे. यातील ४३५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून यातील १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४१५ जण निगेटिव्ह आले आहेत. परंतु हे १९ जण पॉझिटिव्ह असतानाही बेफिकीरपणे बाजारात फिरून सुपर स्प्रेडरचे काम करत असल्याचे समोर आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com