पोलिसांकडून टवाळखोरांना दंडूक्याचा प्रसाद

पोलिसांकडून टवाळखोरांना दंडूक्याचा प्रसाद

नाशिकरोड । प्रतिनिधी

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने काल पासून लॉकडाउनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. लॉकडाउन गांभीर्याने न घेणार्‍या टवाळखोर व मद्यपींना उपनगर पोलिसांनी दंडूक्याचा प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. संचारबंदी उल्लंघन, विनामास्क फिरणारे आदी 57 प्रकरणी 51 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, परदेशी, खडके, लोंढे, बटुळे, प्रशिक्षणार्थी पोलिस बीडकर, शिंदे, कोळी, पवार आदींनी ही कारवाई केली.

कारवाईसाठी आठ पथके स्थापन करण्यात आली असून ते 22 मेपर्यंत सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत कारवाई करणार असल्याचे अनिल शिंदे यांनी सांगितले. फक्त मेडिकल दुकानेच सुरु ठेवण्यात आली असून अन्य व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

नारायणबापू चौक, नाशिक क्लब, खोले मळा आदी ठिकाणी टवाळखोर दंडुक्यांचा प्रसाद देण्यात आला. जयभवानी रोड, जेलरोड, नाशिक-पुणे रोड, बिटको पाईन्ट येथे मद्यपींवर कारवाई करण्यात आली. रात्री चौकात बसणारे व फिरणारे टवाळखोर पोलिसांचे लक्ष्य आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com