दहशत माजवणार्‍यांना पोलिसांचा वचक

दहशत माजवणार्‍यांना पोलिसांचा वचक
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मकरसंक्रांतीच्या (makar sankrant) सायंकाळी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या दहिपूल भागात दोन गटांमध्ये व्यवसायिक कारणावरून तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित अ‍ॅक्शन घेत यातील एकूण 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

त्यांची सखोल चौकशी सुरू असून आज पोलिसांनी या सर्व आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन दहशत कमी करण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी सखोल चौकशीसाठी काही ठिकाणी झडती देखील घेतली. यात महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार (Senior Police Inspector Dutta Pawar) यांनी दिली. सोमवारी दोघांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची तर इतर 12 जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.

संशयित आरोपींची नावे अशी

ऋषी उर्फ ऋषीकेश किरण खैरे (वय 26, राहणार- 2262, खैरेवाडा, आसराची वेस, मोदकेश्वर मंदिर, जुने नाशिक), सुशिल उर्फ हेमराज उर्फ यमराज मनोहर गायकवाड (वय 28 राहणार - मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, द्रौणागिरी रोहाउस, नाशिक), नरेश हिरालाल ठाकरे (वय 29 रा. पौर्णिमा स्विट्स, खुटवड नगर, सिडको, नाशिक), लवकुश दयाल यादव (वय 26, रा. अशोकस्तंभ जवळ, नाशिक. मुळ रा. अचलपुरा, तहसिल-मेवणा जि. भिंड, मध्यप्रदेश), चेतन पांडुरंग खैरणार (वय 25 रा. काझीगढी, कुंभारवाडा, जुने नाशिक), बाळा बाबुलाल प्रसाद (वय 25, रा. 54 क्वॉर्टर समोर, भद्रकाली नाशिक),

गौरव उर्फ गणेश राजेंद्र खैरे (वय 24 वर्षे, राह. 4136, आसराची वेस, जुने नाशिक), ओम सतिष खैरे (वय 19 वर्षे,, राह. पाटील गल्ली, घर नं.4095, बुधवारपेठ, जुने नाशिक), शुभम संतोष दाते (वय 19 वर्षे, राह. रेशिमबंध लॉन्सचे पाठीमागे, त्रिकोणी बंगल्याजवळ, चिंतामणी हौ.सो. अ / 404, चिंतामणीनगर, हिरावाडी, पंचवटी), प्रविण नरेश बोराडे, वय 19 वर्षे, रा. चित्रघंटा, भाबडवाडा, घर नं. 2118, साक्षि गणपती पाठीमागे, भद्रकाली, नाशिक),

ओमकार कुंदन जगताप, वय 20 वर्षे, राह. घर नं.4117, पाटील गल्ली, शिरीषकुमार चौक, बुधवारपेठ), शुभम जगन्नाथ जायभावे, (वय 19 वर्षे, 1 राह. घर नं. 2314, गजराज चौक, पाटील गल्ली, भद्रकाली, नाशिक), राकेश अनिल जगताप (वय 27 वर्षे, घर नं. 4157, दिक्षीत चाळ, आसराची वेस, जुने नाशिक), लक्ष्मण काशीनाथ साबळे (वय 27 वर्षे, रा. भंडारीबाबा चौक, कुंभारवाडा, जुने नाशिक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com