पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरने शोधला रामशेजवरील नवा मार्ग

पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरने शोधला रामशेजवरील नवा मार्ग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील टीम पॉईंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरचे (Team Point Break Adventure ) ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर ( historic Ramshej fort ) जाण्यासाठी पश्चिम दिशेला आणखी एक मार्ग शोधला आहे(A way has been found ). रामशेजवर जाण्यासाठी आशेवाडी या गावातून पारंपरिक मार्ग आहे. तसेच गावाच्या उत्तरेला दुसरा मार्ग आहे.परंतु,या व्यतिरिक्तही आणखीन एक मार्ग पश्चिमेला असल्याचे दुर्गसंवर्धकांनी सांगितले.

दुर्ग रामशेज गडावर घेऊन जाणारा ऐतिहासिक तिसरा पायरी मार्ग असल्याच्या काही खाणाखुणा मार्च महिन्यातील दुर्ग रामशेज गडाच्या आडवाटेच्या भटकंतीमध्ये टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरचे गिर्यारोहक जॅकी साळुंके, हेमंत पाटील यांच्या लक्षात आले.

हा मार्ग बरेच वर्ष दुर्गप्रेमीपासून अपरिचित होता.हा ऐतिहासिक ठेवा दुर्गप्रेमीच्या समोर यावा,तसेच या मार्गातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे.या उद्दिष्टाने तीन पॉईंट ब्रेक अ‍ॅडवेंचर्स नाशिक या गिर्यारोहक या संघानेे 29 मार्च रोजी या मार्गाची मोहीम घेऊन हा मार्ग सुरक्षित प्रस्तरारोहन करीत दुर्ग रामशेज गडाचा माथा गाठला. या मार्गावर रोहन करीत असताना काही कोरीव पायर्‍या त्यानंतर उध्वस्त भग्नावस्थेतील मार्गातील दोन बुरुज हा ऐतिहासिक खजिना दुर्गप्रेमी समोर घेऊन येण्याच्या प्रयत्नांना यश आले.

हा मार्ग गडाच्या पश्चिमेला आहे. या मार्गाची चढाई करण्यासाठी मध्यम श्रेणीचे काही कातळ टप्पे रोहन करीत निसरड्या वाटेने दुर्ग रामशेज गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.ही मोहीम सुरक्षित व यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी टीम पॉईंट ब्रेक अ‍ॅडवेंचर परिवारातील गिर्यारोहक जँकी साळुंखे, हेमंत पाटील,चेतन शिंदे,विशाल बोडके,युगंधर पवार, भूषण जाधव यांचा समावेश आहे.

दुर्ग रामशेज गडावर घेऊन जाणारा ऐतिहासिक तिसरा पायरी मार्ग असल्याच्या काही खाणाखुणा मार्च महिन्यातील दुर्ग रामशेज गडाच्या आडवाटेच्या भटकंतीमध्ये टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरचे गिर्यारोहक जॅकी साळुंके यांच्या लक्षात आले. हा मार्ग बरेच वर्ष दुर्गप्रेमीपासून अपरिचित होता. हा ऐतिहासिक ठेवा दुर्गप्रेमीच्या समोर यावा तसेच या मार्गातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे. हाच महत्त्वपूर्ण उद्देश आमच्या टीम पॉईंट ब्रेक अँडवेंचर्सचा आहे.

हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक, दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय गंगापूर

Related Stories

No stories found.