नाशिक ऑक्सिजन लिकेज : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं सांत्वनपर ट्विट

नाशिक ट्विटर ट्रेंडवर
नाशिक ऑक्सिजन लिकेज : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं सांत्वनपर ट्विट

नाशिक | Nashik

नाशिक येथील ऑक्सिजन घटनेने खूप दुःखी आहोत. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे, त्यांचा दुःखात आम्ही सहभागी असल्याचे ट्विट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

आज सकाळी नाशकतील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना घडली. यामध्ये जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.

Title Name
नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती
नाशिक ऑक्सिजन लिकेज : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं सांत्वनपर ट्विट

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विट :

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये झालेली घटना मन हेलवणारी. अशावेळी कुटुंबियांच्या सांत्वन महत्वाचं आहे.

तर गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विट : नाशिकमधील इस्पितळात ऑक्सिजन गळतीच्या अपघाताची बातमी ऐकून मी दु:खी झालो आहे. ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले त्यांच्या बद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या कार्यक्षमतेसाठी मी देवाला प्रार्थना करतो.

दरम्यान येथील परिस्थीतीची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे थोड्याच वेळात पोहचत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com